जळगाव- येथील रेडक्रॉस जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष गनी मेमन यांची डी. आर. यु.सी. सी. भुसावळ सदस्यपदी रेल्वे महाप्रबंधक डी. के. वर्मा यांनी निवड केली आहे .
रेल्वे महाप्रबंधक यांना एक प्रतिनिधी सदस्य निवड करण्याचा अधिकार आहे . त्यानुसार नासिक, धुळे , बुलढाणा , अकोला , यवतमाळ , अमरावती ,खांडवा , रावेर,भुसावळ ,जळगाव येथील खासदार हे डिव्हिजनल रेल्वे युजर्स कौन्सलटेटिव्ह कमिटी भुसावळ यासाठी नेमणूक करण्यात आली आहे . हि निवड भुसावळ विभागासाठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत करण्यात आली आहे . निवडीबद्दल गनी मेमन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . दरम्यान गनी मेमन यांनी जळगाव शहरात अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत . यामध्ये जळगाव रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण, प्रवाशांसाठी सोयी सुविधा , पाण्याची व्यवस्था , कुलींसाठी आरोग्य तपासणी शिबीर , ,रेल्वे परिवार स्वछता अभियान , पार्किंग व्यवस्था यासह अन्य कामांचा समावेश आहे .