गनिमिकाव्याने बैलगाडी शर्यत; पोलीस आणि प्रशासन अनभिज्ञ; अचानक प्रचंड गर्दीने उडाली तारांबळ… व्हिडीओ….
सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे बैलगाडी शर्यत कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने कंबर कसली होती. या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. ठिकठिकाणी नाकेबंदी होती. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तरीही झरे गावाच्या हद्दीवर वाक्षेवाडी त्या पठारावर गनिमी काव्याने बैलगाडी शर्यत पार पडली. पोलीस यंत्रणा किंवा प्रसासानेला कल्पनाही न होता बैलगाडी शर्यत पार पडली
बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे बैलगाडी शर्यत पार पाडली. या शर्यतीत दहाहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला. तर परिसरातील बैलगाडी शौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
आयोजकांनी पोलिसांना गुंगारा देत रातोरात झरे गावाशेजारी असलेल्या निंबवडे गावाच्या हद्दीत मैदान तयार केले. गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यती पार पडल्या. आटपाटी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान या शर्यती झाल्या. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाजा चालक आणि मालक सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येतेय. शुक्रवारी पहाटेपासूनच मैदानात शर्यत शौकीनांनी गर्दी केली होती. पोलिसांना सुगावा लागण्यापूर्वीच आयोजकांनी शर्यत पार पडली यावेळी मोठ्या संख्येने शर्यत शौकिनांची गर्दी होती.
पोलीस पोहोचताच बैलगाडी मालक व शर्यत शौकीन निघून गेले. पोलिसांनी बळाचा वापर करत शर्यत रोखण्याचा प्रयत्न केला. शर्यत पार पडल्याने राज्य सरकारला योग्य संदेश पोहोचला आहे. पशुधन वाचविण्यासाठी शर्यत झालीच पाहिजे. बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी पुढील आंदोलन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कटगुण गावातून लवकरच सुरू करणार आहे. राज्यभरातील बैलगाडी मालक कटगुणमधून बैलगाडीने मुंबईत पोचतील, अशी घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. दरम्यान, बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. यावर पोलिस काय कारवाई करणार हे आता पहावे लागणार आहे.
https://www.facebook.com/lokshahilive/videos/279465793941308