भुसावळ : शहरातील झेडटीसी भागाजवळच्या तापी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत गेलेल्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला असून तिच्या भावाला मात्र वाचवण्यात यश आले आहे. ही घटना आज रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडलीय. अनन्या मनीष यादव (9) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
शहरातील झेडटीएस परीसरातील रहिवासी तथा रेल्वेतील रेल्वे टीटी मनीष यादव हे कुटुंबासह दिड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी तापी पात्रावर रविवारी सकाळी आले होते. यावेळी त्यांची मुली आर्यनराज व अनन्यादेखील सोबत होते. गणरायाचे विसर्जन करताना पाय निसटल्याने दोघे भावंडे पाण्यात पडली.
ही घटना पाहताच संत गाडगेबाबा हायस्कूलचे शिक्षक पाचपांडे यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी आर्यनराज यास वाचवण्यात यश आले मात्र अनन्या पाण्याचा प्रवाहात वाहून गेली. या घटनेने या परीसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी कंडारी पोलीस पाटील रामा यादव घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली