गणेशोत्सवापूर्वी ११ महिन्यांचा महागाई भत्ता देऊन शासनाने आपला शब्द पाळावा;- कर्मचारी नेते भाऊसाहेब पठाण

0

पाचोरा (प्रतिनिधी) :गणेशोत्सवापूर्वी अकरा महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते तरी आपला शब्द पाळून कर्मचाऱ्यांना ही थकबाकी द्यावी अशी मागणी राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे.

केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढीचे राज्यातदेखील धोरण आहे. त्यास अनुसरून महागाई भत्ता वाढ राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्त यांना देण्याचा निर्णय शासन घेते. मात्र केंद्र शासनाने महागाई भत्ता मंजूर केल्यानंतरही काही महिने उशीरा राज्य शासन निर्णय घेत असल्यामुळे महागाई भत्त्याची थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. गतवर्षीची जानेवारी ते नोव्हेंबर – २०१९ या कालावधीतील ११ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना मिळाली नाही, तरी ही विनाविलंब मिळावी. अशी मागणी राज्य सरकारी गट – “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना सादर केले आहे. या पत्रावर अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, सरचिटणीस प्रकाश बने व कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.