बोदवड – येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी विद्या अशोक कऱ्हाळे या विद्यार्थीनीने गणित विषयात सेट परीक्षेत उत्तम यश नुकतेच मिळवले.बोदवड महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या इतिहासात सौ.विद्या कऱ्हाळे ह्या प्रथम विद्यार्थीनी आहेत,ज्या सेट परीक्षेत यश संपादन करू शकल्या.बोदवड महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून प्रथम आणि द्वितीय वर्षे पूर्ण केले होते.नंतर जामनेर महाविद्यालयात तृतीय वर्षे पूर्ण केले.त्यानंतर पदवित्तर शिक्षण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पूर्ण केले.राज्यात या परीक्षेचा निकाल फक्त 6.87% इतका लागला.म्हणजेच 79,879 पैकी 5,415 फक्त एवढेच विद्यार्थी पास झालेत.त्यांना बोदवड महाविद्यालयातील तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गणित विभागाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभल्याने या परीक्षेत यश मिळवू शकले असे सांगितले.पुढे त्यांचा गणित विषयात संशोधन करण्याचा मानस आहे. महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांना आदर्शस्थानी मानणाऱ्या,स्त्रीशिक्षणाला तसेच उच्च शिक्षणाला अत्यंत महत्त्व देणाऱ्या त्यांच्या परिवारातील त्यांचे वडील स्व.अशोक कऱ्हाळे,आई प्रमिला कऱ्हाळे,काका विजय कऱ्हाळे तसेच त्यांचे पती यतिन गायकवाड,सासरच्या मंडळीं यांचे सतत प्रोत्साहन मिळाले आणि मोलाची साथ लाभली.
नेहमी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्याऱ्या बोदवड महाविद्यालयाचे चेअरमन श्री. मिठूलालजी अग्रवाल,सचिव विकासजी कोटेचा,उपाध्यक्ष अजयजी जैन आणि जेष्ठ संचालक प्रकाशचंदजी सुराणा,प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.गणित विषयात सेट परीक्षेत असे यश मिळणारी नाडगाव येथील पहिलीच विद्यार्थिनी आहेत.या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे शिक्षक,मित्रमंडळी , नातेवाईक,गावकरी यासर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .