जळगाव : अनंत चतुदर्शी अर्थात गणपती विसर्जनाच्या दिवशी जळगाव शहरास जिल्ह्यात ढोल ताशाचा गजर, गुलाल व फुलांची उधळण त्यात भाविकांचा उत्साह द्विगुणीक आपल्याला दरवर्षी पाहण्यास मिळतो. परंतू यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामूळे र्सव सण-उत्सावर विरजण पडले. त्यात गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या गणपती उत्सव देखील मार्यादीत स्वरुपात साजरा करण्यात आला. त्यानुसार मेहरुण तलाव येथील गणेश घाटावर शहरातील मुर्ती संकलनीत झालेल्या केंद्रावरील मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त सतिष कलुकर्णी,अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलाभ रोहन व रेडक्राँस स्वयंसेवक, सार्वजनीक गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्या हस्ते मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.



