अमळनेर ;- तालुक्यातील गडखांब येथे राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत तापी नदीकाठावरुन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यापाणी पुरवठा योजनेची किंमत अंदाजे रु.85 लक्ष एवढी असून यामुळे गडखांब गाव पाणी टंचाईतून मुक्त होणार आहे. दरवर्षी अवर्षणप्रवण असलेल्या या भागात तापी नदीकाठावर पाणी योजना हवी होते बऱ्याचवेळा या गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो ही बाब पाहून या योजनेसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी सतत पाठपुरावा केला होता. यासह आमदार अनिल पाटील यांनीही यासाठी मदत केली होती. त्यामुळे योजनेचा कामाचा भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नथ्थु मन्साराम पाटील हे उपस्थित होते, यावेळी अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, एस.टी.कामगार नेते एल.टी पाटील, गडखांब वि.का.स सोसायटी चेअरमन भास्कर बोरसे, निवृत्त अभियंता व्ही.टी.बोरसे, उपसरपंच मधुकर उत्तम पाटील, सदस्य विश्वास पाटील, शशिकांत पाटील, नंदु पाटील, मोतीलाल पाटील, काॅन्ट्रॅक्टर राजहंस कन्स्ट्रक्शन-पारोळा, मगन पाटील, विनायक पाटील, दिनेश पाटील, प्रशासक सुधीर पाटील ग्रामसेवक पवार यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.