चाळीसगाव :- तालुक्यातील टाकळी प्र चा येथील रहिवासी माजी सैनिक सोनू महाजन व त्यांच्या धर्मपत्नी मनीषा महाजन यांनी आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन आमच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या अनुषंगाने मेहरबान हायकोर्ट औरंगाबाद यांच्या आदेशानुसार चाळीसगाव पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना 21 मेपर्यंत अटक न झाल्यास आम्ही चाळीसगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.,
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिनांक 2/6/ 2016 ला माझ्यासह माझ्या पतीला झालेल्या मारहाण प्रकरणी आदरणीय औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चाळीसगाव चे आमदार उन्मेश पाटील, मुकुंदा भानुदास कोठावदे, भावेश मकुंदा कोठावदे, भारती मकुंदा कोठावदे, पप्पू मुकुंदा कोठावदे, लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे, भूषण उर्फ शुभम बोरसे ,जितेंद्र वाघ, यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिनांक 7/ 5/ 2019 ला आयपीसी 307, 395, 324 ,143, 147 ,148 ,149 ,504, 506, व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन आज जवळपास नऊ ते दहा दिवस उलटून सुद्धा सदर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी राजकीय दबावाखाली अटक केलेली नाही त्यामुळे आरोपींची हिम्मत वाढली असून ,आरोपींपैकी मुकुंदा भानुदास कोठावदे व भावेश मुकुंदा कोठावदे हे व त्यांचे काही सहकारी माझ्यासह माझ्या नवर्याला व साक्षीदारांना दमबाजी करत आहे. आमदार उन्मेश पाटील त्यांचे एक सहकारी माझ्या नवर्याला व साक्षीदारांना दमबाजी करीत आहेत, आमदार उन्मेश पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा, म्हणून आमच्या मागे शहरातील काही टारगट मुले लावून दिलेली आहेत ,माझे साक्षीदार एकनाथ रावसाहेब पाटील यांना घृष्नेश्वर रामकृष्ण पाटील व त्यांच्या सहकार्यांनी पिलखोड येथे जाऊन दमबाजी केली. या गुन्ह्यातील आरोपी बिनधास्तपणे चाळीसगाव शहरात फिरत असून त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई होत नसल्याने आमच्या दोघांच्या व साक्षीदारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत.
टाकळी प्र चा येथील खरजई रोड लगत मकुंदा भानुदास कोठावदे यांच्या मालकीचे साईप्रसाद किराणा या नावाचे चे घर ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 16 54 या इमारतीच्या वरच्या मजल्याचे तीन रूम मी दिनांक 29 /9/2010 ताबेगहाण केलेले आहे. सदर चे घर माझ्या कब्जात व माझ्या ताब्यात असताना सदरच्या घरात माझ्या मालकीच्या जवळपास आठ लाख 89 हजार 250 रुपये किमतीच्या संसारोपयोगी सामानासह फर्निचर सोन्या-चांदीचे दागिने फ्रिज टीव्ही कुलर या वस्तू होत्या दिनांक 2/7/2016 पासून ते 8/5/2019 पर्यंत आम्ही त्या घरात गेलेलो नाही व घराला आमचे कुलूप होते. असे असताना मकुंदा भानुदास कोठावदे ,भावेश मकुंदा कोठावदे ,भारती मुकुंदा कोठावदे ,पप्पू मुकुंदा कोठावदे ,लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे ,यांनी वर नमूद केलेल्या कालावधीत आमच्या घरातील वस्तू चोरून नेले आहेत याबाबत मी दि 9/ 5 /2019 ला चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप सदर चोरीप्रकरणी संबंधितांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केलेल्या नाही. पोलीस पूर्णपणे राजकीय दबावाखाली काम करीत असून आरोपींची देखील पाठराखण करीत आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असून आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा राहिलेली नाही. म्हणून आम्ही येत्या 21 तारखेपर्यंत पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास तसेच मकुंदा भानुदास कोठावदे भावेश मुकुंदा कोठावदे भारती मुकुंदा कोठावदे पप्पू मुकुंदा कोठावदे लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे यांच्याविरुद्ध मी दिनांक 9/ 5 /2019 दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक न केल्यास मी माझ्या कुटुंबासह चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. आमच्या उपोषणामुळे आमच्या होणार्या सर्व प्रकारच्या मानसिक, आर्थिक, त्रासाला चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी जबाबदार असतील असेही त्यांनी सांगितले.