खोटे दस्तऐवज तयार करून घर नावे लावल्याने ग्रामसेवकासह पाच जनांविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

0
 खेडगांव नंदीचे येथील प्रकार
पाचोरा  प्रतिनिधी
      खेडगांव (नंदीचे) तालुका पाचोरा येथे कट – कारस्थान रचून बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत नावावर लावण्यासाठी ग्रामपंयतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकाने खोटे ठराव पारीत केल्याने मुळ मालकाने पाच जणांविरुध्द जिल्हाधिकारी जळगांव, मुख्यकार्यकारी अधिकारी जळगांव, व गटविकास अधिकारी, पाचोरा यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
     जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी मुळ घर मालक सत्यवान बळीराम पाटील यांनी म्हटले आहे की, खेडगाव (नंदिचे) येथील त्यांचे मालकीची मालमत्ता क्रमांक २९७/२९८ व ५७३ ह्या स्वमालकीच्या असून येथील सरपंच ज्योती सुखदेव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत ग्रामसेवक सुरेश रामदास पाटील यांनी सदर मिळकती ललिता निलेश पाटील यांचे सांगण्याहुन लावण्यात आल्या. त्या ठरावावर उपसरपंच भरतसिंग जामसिंग पाटील, सदस्य ब्रिजलाल हरकचंद संघवी यांनी सह्या केल्या. याबाबत न्यायालयाचे कोणत्याही प्रकारचे आदेश नसतांना व दि. २१ सप्टेंबर २०१७ पासून लिज पेंडंशी दस्ताचा अंमल किंवा नोंद उताऱ्यावर न लावण्याचा आदेश पारीत असतांना वरील लोकांनी संगनमत करून सत्यवान बळीराम पाटील यांचे नावावरील मिळकती ललिता निलेश पाटील यांचे नावे लावल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सत्यवान बळीराम पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.