Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»नोकरी संदर्भ»खूशखबर! Infosys २६ हजार तरूणांना यंदा नोकरी देणार
    नोकरी संदर्भ

    खूशखबर! Infosys २६ हजार तरूणांना यंदा नोकरी देणार

    By April 15, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशावर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्यामुळे अनेकांचे रोजगार आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्डाड कोसळली आहे. मात्र, या परिस्थितीमध्येही भारतातील Infosys या  आघाडीच्या आयटी कंपन्यांसाठी मात्र सुगीचे दिवस आले आहेत. या कंपनीने २०२१ मध्ये २६ हजार नोकर भरती करण्याची घोषणा केली आहे. कारण  या कंपनीचा निव्वळ नफा मार्चच्या तिमाहीमध्ये १७.५ टक्क्यांनी वाढून ५ हजार ७६ कोटी इतका झालेला आहे. त्यामुळे मागील वर्षी जानेवारी-मार्चमध्ये निव्वळ नफा ४ हजार ३२१ कोटी इतका झाला आहे. इन्फोसिसने बुधवारी वर्क फ्रॉम होममुळे आयटी सेवांच्या जादा मागणीमुळे नफा वाढला असल्याचं सांगितले.

     

    आयटी सेवेची मागणी वाढल्याने यंदा कंपनी नवीन नोकर भरती करण्यावर भर देणार आहे. कंपनीला २०२१-२२ च्या महसुलात १४ टक्के नफा होण्याचा अंदाज आहेत. मार्चच्या तिमाहीमध्ये उलाढाल १३.१ टक्क्यांनी २६ हजार ३११ इतकी झाली. कंपनीचे सीईओ सलिल पारेख म्हणाले की, या वर्षी भारतासह जागतिक स्तरावर २६ हजार तरूणांना रोजगार देणार आहोत. कंपनी १७५० रुपये दरावर ९,२०० कोटींचे शेअर्स बायबॅक करणार आहे.

     

    जूनपर्यंत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखापर्यंत पोहचली. त्याचसोबत ही कर्मचाऱ्यांच्या एसेंचर तुलनेत दुसरी मोठी आयटी कंपनी बनली आहे. देशात रेल्वेनंतर सर्वात मोठी कंपनी आहे. एसेंचरकडे ५ लाख ३७ हजार तर रेल्वेकडे १२.५४ हजार कर्मचारी आहेत. मार्चपर्यंत टीसीएसमध्ये ४ लाख ८८ हजार ६४९ कर्मचारी होते. कंपनी ४० हजार नोकर भरती करणार आहे.

     

    लसीकरण कार्यक्रम आणि गतिमान आर्थिक सुधारणेच्या अपेक्षेने यंदा कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. ओएलएक्सच्या सर्व्हेनुसार, आयटी, ई कॉमर्स मॅन्यूफॅक्चरिंग इन लॉजिस्टिक आणि एफएमसीजीसह अन्य क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. १६ टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे की, ते यंदा १०० टक्के क्षमतेने नवीन नोकरी भरती करणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif