खूशखबर ! तब्बल 24 दिवसांनी स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे ताजे दर

0

मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दरात आज बुधवारी कपात करण्यात आली आहे.  आज देशभरात पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल १७ पैशानी स्वस्त झाले आहे. त्याआधी सलग २४ दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आजच्या दर कपातीने ग्राहकांना किंचिंत दिलासा मिळाला आहे.

आजच्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.४० रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.४२ रुपये झाला आहे. त्याआधी सलग २४ दिवस मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर आणि डिझेल ८८.६० रुपये होते. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.९९ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.३० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.९५ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.२९ रुपये भाव आहे.

आज बुधवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.१८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.१८ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.०४ रुपये असून डिझेल ८६.२१ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.५८ रुपयांचा विक्रमी दर आहे.

मागील दोन आठवड्यात जागतिक बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा भाव जवळपास १० ते १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याआधी ब्रेंट क्रूडचा भाव ७१ डॉलरवर गेला होता ज्यात मागील दोन आठवड्यात नफावसुली झाली आणि तेलाचा भाव ६४ डॉलरखाली घसरला आहे. सध्या जागतिक कमॉडिटी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ५९.३८ डॉलर इतका खाली आला होता. ब्रेंट क्रूडचा भाव ६२.२६ डॉलर झाला होता. मंगळवारी डब्ल्यूटीआय तेलाचा भाव ६१.५४ डॉलर प्रती बॅरल होता. तर ब्रेंट क्रूडचा भाव ६४.६५ डॉलर प्रती बॅरल होता.

Leave A Reply

Your email address will not be published.