वॉशिंग्टन :चीनच्या वुहानमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोना विषाणूमुळे ९ हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. विविध देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या जात आहे. एकीकडे कोरोनाची दहशत वाढली आहे. मात्र अद्याप कोरोनाला हरवण्यासाठी औषध सापडले नाही आहे. दरम्यान, अमेरिकेने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी मलेरिया औषधास मान्यता दिली आहे.
याआधी कोरोनाच्या लसीची चाचणी सध्या अमेरिकेत सुरू आहे. असे असताना अमेरिकेने कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी मलेरियाच्या औषधास मान्यता दिली आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी मलेरिया औषधास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती देत, मलेरिया आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन नावाच्या औषधाने कोरोना विषाणूच्या उपचारात बरेच चांगले परिणाम दर्शविले आहेत. त्यामुळं अमेरिकेत सध्या याबाबत चाचणी करून इतर देशांनाही हे औषध देण्यात येईल.
जगात सुमारे 2 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूमुळे 9 हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढली आहेत. भारतात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.