खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेपची शिक्षा

0

भुसावळ :– मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर पंडीत  खोडे कोळी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस पी डोरले यांनी हा निकाल दिला आहे.

येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयाने आज 15 मे 2019 रोजी आरोपी ज्ञानेश्वर पंडीत खोडे रा० तरोडा॥ ता मुक्ताईनगर यास त्याने फिर्यादी सविता प्रमोद पाटील रा . तरोडा, ता . मुक्ताईनगर यांचे पती प्रमोद निना पाटील यांना जुने भांडणाचा राग मनात धरून व आरोपी व त्याचे भावाविरुद्ध दाखल भा .द . वि . ३२४चा गुन्हा मुक्ताईनगर न्यायलायात प्रलंबित खटला मागे घ्यावा म्हणुन  दि . ०३/०९ /२०१५ रोजी सकाळी ०८ : ३० वाजता लोखंडी कुऱ्हाडीने मयताच्या कानाच्या खाली मानेवर डोक्याचे मागील बाजुस, उजव्या हाताच्या बोटावर, गालावर, वार करून मयतास गंभीर जखमी केले त्यातच मयत प्रमोद निना पाटील यांचा मृत्यु झाला .  फिर्यादीच्या फिर्याद वरून  आरोपी विरुद्ध मुक्ताईनगर पो.स्टे. ला गु. र.नं.१३२/१५ हा भा.द.स. कलम ३०२ प्रमाणे दाखल झाला होता.  सरकार तर्फ या खटल्याचे कामी एकुण तपासी अंमलदार अे .पी.आय.एच. ए . कडुकार सह एकुण ०८ साक्षीदार तपासण्यात आले . गुन्हा दाखल झाल्यापासुनच आरोपी हा जेलमधे होता. ह्या खटल्याचे कामकाज न्या . एस .पी. डोरले सो. यांचे कोर्टात चालले. आरोपीस आज रोजी साक्ष पुराव्याअंती कलम ३०२ अन्वये दोषी धरण्यात येऊन कलम ३०२ साठी सक्तमजुरीची जन्मठेप व २००० / – रु दंडाची शिक्षा ठोठावली सरकार तर्फे खटल्याचे काम अति. शासकीय अभियोक्ता

अॅड . विजय खडसे  यांनी काम चालविले तसेच फिर्यादी तर्फे खाजगी वकील म्हणुन अॅड . मनिषकुमार वर्मा यांनी काम पहिले व अॅड . विजयालक्ष्मी मुत्याल, अॅड .सचिन कोष्टी यांनी सहकार्य केले  आरोपीतर्फे अॅड . प्रफुल पाटील व अॅड . जया झोरे  यांनी काम पाहिले

Leave A Reply

Your email address will not be published.