खा.रक्षाताई खडसे यांनी बोदवड येथे ५ हजार २०० मास्कचे केले वाटप

0

बोदवड – कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी बोदवड तालुका ग्रामीण रुग्णालय,पोलीस स्टेशन,नगरपंचायत,व तालुक्यातील पत्रकार बांधव यासह तालुक्यातील एणगाव तसेचं येवती प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ५२०० मास्क वाटप केले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विनोद कोळी,पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास पाटील,भाजपा कार्यकर्ते सईद बागवान,विजय चौधरी,सचिन(फिला) राजपूत,किरण वंजारी,विजेंद्र पाटील,नितीन कोळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.