जळगाव ;– संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने यांच्या निषेधार्थ पं जळगाव लोकसभेचे खासदार ए.टी.नाना पाटील हे जळगाव येथे शिवतीर्थ मैदान येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९. वाजता एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसलेआहेत.
त्यांच्या समवेत उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, जिल्हापरिषद अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष .उदय वाघ, जिल्हामहानगर अध्यक्ष आमदार सुरेश भोळे(राजूमामा), आ. चंदुभाई पटेल, विरोधी पक्ष नेते वामन खडके, मनपा गटनेते सुनील माळी हे उपोषणाला बसले आहेत.