चाळीसगाव (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या घरासमोर चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाचे वतीने दि .२० रोजी सकाळी ११ वाजता ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात ५८ मुक मोर्चे शांततेत काढण्यात आले आरक्षणासाठी ४१ मराठा बांधवांनी आत्मबलीदान दिले आहे . मोठ्या संघर्षानंतर आरक्षण मिळाले होते .
तत्कालीन राज्य सरकारने मागासवर्ग आयोग नेमून त्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले गेले. मागील दोन वर्षापासून मराठा आरक्षण विषय खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यातील आरक्षणाला स्थगिती न देता मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने मोठा प्रश्न समाजासमोर उभा टाकला आहे . सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पाच सदस्यीय घटनापीठाकडे मराठा आरक्षण हा विषय देऊन नोकरी व शैक्षणिक विषय व इतर आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड नाराजी आहे .सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यास अपयशी ठरले असून मराठा समाजाच्या मुलांना नोकरीमध्ये जाण्याची व उच्च शिक्षण घेण्याची संधी राज्य सरकार मुळे गेलेली आहे. मराठा तरुणांचे जीवन अंधकारमय झाले आहे .सरकारने सर्वोच्च न्यायालयात निशांत वकील न देता योग्य व भक्कम बाजू न मांडल्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजाच्या बांधवांकडून तीव्र शब्दात राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त होत आहे . केंद्र सरकारने ई डब्ल्यू एस 10 % आरक्षण सुवर्ण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना दिले.त्या आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाली नाही. म्हणून केंद्र सरकारने ई डब्ल्यू एस आरक्षण ज्या निकषावर दिले त्याच निकषांनुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ५० % च्या वर आरक्षण देता येत नाही असे सांगितले आहे. मात्र तामिलनाडु सरकारने ५९ % आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाला ही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता घटनापिठाकडे पाठवले आहे. कारण दक्षिणेकडील राज्यांनी केंद्राच्या परिशिष्ट ९ मध्ये आरक्षण विषय टाकुन कायद्याचा आधार घेतला आहे. म्हणून केंद्र सरकारने त्याच धर्तीवर ई एस बी सी जे आरक्षण मराठा समाजाला राज्य सरकारने दिले आहे. ते केंद्राच्या परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट करावे. तसेच खासदार नचिपन यांच्या अध्यक्षते खालील समितीचा अहवाल स्वीकारावा या न्याय मागणीसाठी राज्यभर सत्ताधारी खासदार ,मंत्र्यांना जागे करण्यासाठी त्यांच्या घरी ढोल बजाओ आंदोलन करण्यात येत आहे .
केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला असलेली स्थगिती उठविण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या घरासमोर चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाचे वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले आहे .मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ न मिळाल्यास यावेळी नव्या आंदोलनाच्या गंभीर इशारा चाळीसगाव मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आला आहे . याप्रसंगी लक्ष्मण शिरसाठ,गणेश पवार,पंकज रणदिवे, खुशाल पाटील यांनी आपले आरक्षण विषयी मत व्यक्त केले आंदोलनात ,लक्ष्मण शिरसाठ,पंकज रणदिवे,अरुण पाटील, खुशाल पाटील,संजय कापसे ,भाऊसाहेब सोमवंशी,गोविंद चव्हाण,प्रशांत गायकवाड,सौरभ देवकर आदि मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले होते .