जळगाव : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या केंद्रीय समितीच्या सदस्यपदी खासदार उन्मेष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्याेग मंत्रालयाच्या वाणिज्य कमिटीच्या माध्यमातून देशातील विविध उद्योगांना बळ देण्याचे काम या कमिटीच्याद्वारे केले जाते. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ही नियुक्ती केली अाहे. उत्तर महाराष्ट्रात लहान मोठ्या प्रमाणावर विविध फळांवर प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, फळ प्रक्रिया उद्योग क्लस्टर, गोल्ड आणि प्लास्टिक क्लस्टरसाठी त्यांची मदत हाेणार अाहे.