पिलखोड, ता.चाळीसगाव : दिनांक 24 जुन रोजी जळगांव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिलखोड येथे अमोल सोनार मित्र परीवारा मार्फत व गिरणा परीसर व्हाट्सएपच्या च्या ग्रुप च्या वतीने 350 झाडांचे वृक्षरोपण व रोपे वाटप समारंभ सरपंच नामदेव बाविस्कर माजी सरपंच दिगंबर पाटील डॉ.चंद्रकांत पाटील, भेया पाटील, पोलीस पाटील प्रशांत पाटील,पोपटराव पाटील, गुलाबाराब पाटील, विजय पाटील, सचिन बाविस्कर यांच्या शुभ हस्ते वृक्षरोपण व वाटप समारंभ पार पडला.
गावातील कोरोना योद्धात विशेष योगदान देणारे डॉ.चंद्रकांत पाटील, डॉ अशोक अमृतसर, डॉ डी. बी.निकुंभ, डॉ सिध्दांत बाविस्कर,डॉ.प्रताप निकम,डॉ साळुंखे, डॉ प्रविन,संजय वाघ,विलास पाटील, भालचंद्र नोलखा,दिनेश बाविस्कर, व पेपर वाटप करणारे बंटी चिते,व आशा वर्कर मलेरिया सुपरवायझर डॉ.खैरनार व पोलीस कर्मचारी यांचा सन्मान करून वृक्षरोपे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
याकामी दादा परदेशी,अनु बाविस्कर वसंत पाटील ,भरत शिरोडे,आंनद बोरा,उमेश देव ललित सुराणा,अनिल पाटील,अतुल पाटील,भेया पाटील,गणू पाटील,संदीप वाघ,योगेश पाटील,यांचे सहकार्य लाभले.व गावात ठिकठिकाणी वृक्षरोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
