खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी 4.5 कोटींचा निधी मंजूर

0

मुक्ताईनगर : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील रस्ते व पुल यासारख्या विविध विकास कामांसाठी रु.४.५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामांना चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिले होते. सदर कामांसाठी नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती व सदर कामांसाठी खासदार रक्षाताई खडसेंचा बऱ्याच दिवसापासुन पाठपुरावा सुरु होता. अखेर खासदारांच्या या मागणीचा राज्यसरकारने सकारात्मक विचार केला असून मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील विकास कामांसाठी निधी मिळाला आहे.

सदर कामांना मंजुरी मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून खासदार रक्षाताई खडसे यांचे आभार मानले आहे. मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील मंजूरी मिळालेल्या कामांमध्ये मुक्ताईनगर तालुका अंतर्गत घोडसगाव ते रा.मा-५ जुने कुंड मुक्ताईनगर ते नवी कोथळी ते राज्यमार्ग ६ रस्ता प्रजिमा-२३ किमी ९/१००ते १२/५०० ची सुधारणा करणे व किमी ९/६०० मध्ये आरसीसी बॉक्स सेल मोरीचे बांधकाम करणे कामांसाठी अंदाजित मंजूर किंमत रु.२२५ लक्ष. रावेर तालुका अंतर्गत रा.मा-४५ खिरोदा चिनावल वडगाव निंभोरा बालवाडी तांदलवाडी हतनूर रस्ता रा.मा.-४६ किमी १७/४०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे रु.६० लक्ष. रावेर तालुका अंतर्गत रा.मा.-४५ खिरोदा चिनावल वडगाव निंभोरा बालवाडी तांदलवाडी हतनूर रस्ता रा.मा.-४६ किमी १७/७०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे रु.७० लक्ष आणि बोदवड तालुका अंतर्गत कोल्हाडी निमखेड रा.मा.-२७० ते हरणखेड चिखली मानूर खु. ते रा.मा.-४६ ते शेलवड रास्ता रा.मा.-७५३ एल प्रजिमा-९० किमी ७/०० ते २०/०० ची सुधारणा, रुंदीकरण व हरणखेड गावानजीक संरक्षक भिंत बांधकाम करणे रु.१०० लक्ष इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती खासदार संपर्क कार्यालय मुक्ताईनगर यांचे कडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.