Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खासदारांनी दिलेले १५ व्हेंटिलेटर गायब, भाजप-सेना आमनेसामने
    जळगाव

    खासदारांनी दिलेले १५ व्हेंटिलेटर गायब, भाजप-सेना आमनेसामने

    By April 2, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला.  हे व्हेंटिलेटर दोन दिवसात परत आणण्याच्या सक्त सूचना खासदारांनी जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली. चोपडयातील वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रश्न भाजप व शिवसेना आमने- सामने आल्याचे पहायला मिळाले.

    चोपडा तालुक्यात कोरोन रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी खासदार खडसे होत्या.

    भाजपने काही समस्या चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला तर शिवसेनेने प्रशासनाची बाजू सावरुन धरली. यामुळे दोन्ही बाजूचे पदाधिकारी आमने- सामने आल्याचे चित्र होते.

    बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, प्रांताधिकारी सीमा अहिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमित शिंदे उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लातूरकर यांनी कोविडची परिस्थिती विशद केली.

    नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत बारेला यांनी शहरात २८  टीम  द्वारे सर्वेक्षण सुरू असून शिबिरे घेणे सुरू असल्याचे सांगितले.

    बैठकीत भाजपाचे  पंकज पाटील, गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, आत्माराम म्हाळके तर  शिवसेनेचे  नरेश महाजन, राजेंद्र पाटील, विकास देशमुख, राजाराम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेत जाब विचारला.

    तहसीलदार अनिल गावित, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे , नायब तहसीलदार राजेश राऊळ,  गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, उपजिल्हा रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, नगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यासह अधिकारी व कर्मचारी  आदी उपस्थित होते.

    गाव पातळीवर जास्तीत जास्त चाचण्या

    चोपडा शहरात एकूण सहा खाजगी हॉस्पिटलमध्ये ४४६रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३८ उपकेंद्रे आहेत.  गाव पातळीवर जास्तीत जास्त दररोज सुमारे तीनशे टेस्टिंग करत असल्याचे सांगितले. आतापर्यंत ग्रामीण भागात १९ हजार ४४ व शहरी भागात १० हजार ६१६  टेस्टिंग झाल्याचे स्पष्ट केले .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif