खासगीकरणाविरोधात दीपनगर महाजानको येथे द्वारसभा

0

भुसावळ | प्रतिनिधी
विज कर्मचारी,अधिकारी,अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार राज्यात खाजगीकरणा विरोधात द्वार सभा घेण्यात येत आहे. आज दीपनगर महाजेनको येथे सभा घेण्यात आली.
मुंब्रा, कळवा, शिव, मालेगाव यांच्या खाजगी करणाविरोधात दीपनगर महाजेनको येथे संयुक्त कृती समितीच्या आवाहनानूसार व्दारसभा घेण्यात आली. यावेळी स्टेटम इले.वर्कर्स फेडरेशनचे जितेंद्र वराडे, भरत पाटील, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे संजय सोनवने, .सुनिल पेढवी, सबॉर्डिनेट इजिनिअर्स असोसिएशनचे .अतुल पवार, भावेश सोनजे, म.रा.वीज तांत्रिक कामगार संघटनेचे मनोज मोरे, अश्विन शेखरवार आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्येने संघटना पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.