खामगाव सामान्य रूग्णालयात कोरोना टेस्टसाठी नागरिकांची गर्दी, 879 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

0

खामगांव (प्रतिनिधी) :-जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत असून दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होत आहे. तर स्थानिक सामान्य रूग्णालयात नागरिकांची दररोज कोरोना चाचणी करण्यात येत असून यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक झाले आहे.

जिल्ह्यात 21 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मागील 24 तासात प्राप्त झालेल्या अहवालानुसार 879 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये बुलडाणा 195, चिखली 114, सिं.राजा 104, मेहकर 100, नांदुरा 70, शेगाव 63, मोताळा 63, लोणार 60, खामगाव 48, संग्रामपूर 22, ज.जामोद 19, देऊळगाव राजा 18, मलकापूर 3 असे एकुण 879 रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55700 कोरोना बाधितांपैकी 48298 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 7046 रूग्णांवर उपचार सुरू असून 356 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.