खामगाव : संपूर्ण जगामध्ये व देशामध्ये कोरोना विषाणूने हाहाःकार माजविलेला आहे. यामध्ये अनेक कर्मचारी, अधिकारी वर्ग आपला जीव धोक्यात घालून कोरोना व्हायरसशी,नागरी सुरक्षेशी, लढाई देत प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी सेवा बजावत असताना दिसत आहेत,परंतु नगरविकास विभाग, नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी व कर्मचारी यांचा जीवन विमा उतरविण्यास कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
सर्व नगरपरिषद कर्मचारी यांचा विमा उतरविण्यात यावा म्हणून याबाबत आज दि२७ रोजी पुकारलेल्या नगरपरिषद कर्मचारी हे काळया फिती लावून झोपेच सोंग घेतलेल्या शासनाला जागे करणेकामी आंदोलन आज सकाळी करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य व नगर परिषद खामगाव कर्मचारी संघटना अध्यक्ष मा. मोहनभाऊ अहीर, जिल्हाध्यक्ष अनंत निळे व दुर्गासिंह ठाकूर , कैलास धेडुंदे , सुरेश ठाकूर , मुन्ना राजपुत, थोरवे साहेब, व ईतर सर्व कर्मचारी उपस्थित राहुन निषेध केला.