खामगांव :- देशभरात लॉकडाऊन असतांना सुध्दा अवैध व्यवसायीक विविध मार्गाने प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यासह विविध नशिल्या पदार्थाची वाहतुक लपून छपून करीतच आहे. एसडीपीओ प्रदिप पाटील यांच्या पथकाने केला यांच्या गोडाऊन मधुन 34 लाख रूपयांचा गुटखा एमआयडीसीमधून रात्री 12:30 वाजे दरम्यान पकडला असून यामुळे अवैध गुटखा व्यवसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन असतांना सुध्दा सदर गुटखा खामगांव मधे येतो कसा याबाबत अनेक शंकाकुशंकांना उधाण आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात हा गंभीर प्रकार घडल्याने संबंधीत यंत्रणांच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. एसडीपीओ प्रदिप पाटील व अन्न व प्रशासन यांच्या पथकाला विशेष खबऱ्याकडून माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार शासनाने प्रतिबंध केलेल्या मानवी आरोग्यास हानिकारक असलेला नजर गुटखा 36 पोते किंमत 28,52,200/- रु. व आर जे कंपनीचा पानमसाला 5 पोते किंमत 2,64,000/-रु.विनालेबल सिल्वर पाकिट 5 पोते 60,000/- रु.नजर कंपनीचा गुटखा 18 कट्टे 2,37,600/-रु. ऐसा एकूण 34,12,800 रु. माल जप्त केला आहे. sdpo पथकाने व अन्न प्रशासन यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून या प्रकरणी राजु श्याम गवांदे रा. शंकर नगर खामगांव यास अटक करण्यात आली असून गुटखा जप्त करण्यात आले आहे.लॉकडाऊन सुरु झाल्या पासून गुटखा विक्री जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आली आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोणतेही वाहन असो ते चेक करण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात लॉकडाऊन च्या परिस्थितित गुटख्याची वाहतुक होतेच कशी ? हा प्रश्न सुद्धा येथे उपस्थित होतो.सदर प्रकरणी अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या फिर्यादि वरून आरोपी विरुध्द 364/2020 क,188,260,270,272,273,328 34, भादवी सह क.26(2)(iv),59(i)अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेशाने, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली एस.डी.पी.ओ. प्रदीप पाटील खामगांव यांचे सह पथकातील स.पो.नि. रविंद्र लांडे, पो.ना. सुधाकर धोरात, पो.ना. अमित चंदेल तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रावसाहेब वाकडे (सहायक आयुक्त) अकोला, ग.वा. गोरे अन्न सुरक्षा अधिकारी बुलडाणा यांनी केली आहे.गुटख्याची अवैध वाहतुक करणाऱ्यांचे यामुळे घाबे दणाणले असून पोलीसांच्या सतर्कतेने ही कामगिरी यशस्वी झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.