खामगांव | प्रतिनिधी
आज दि २५ रोजी नाताळ सण जगभरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्तआमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी चांदमारी भागातील बेथाणी अलायन्स चर्चेमधील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. भगवान येषु ख्रिस्त यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेला परोपकार,मैत्री आणि शांतीचा संदेश प्रत्येकाने जीवनात अंमलात आणणे काळाची गरज असल्याचे सांगत मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पस्थितांना नाताळ सणाच्या आणि नुतनवर्शाच्या शुभेच्छा दिल्या व याप्रसंगी ख्रिष्चन धर्मगुरुंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच उपस्थित लहान बालकांना गुलाबपुष्प देऊन नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रतिष्ठीत उद्योजक मधुसुदन अग्रवाल,नगरसेवक किशोरआप्पा भोसले,प्रितम माळवंदे,शुभम मिश्रा,स्वप्नील ठाकरे यांच्यासह ख्रिष्चन समाज बांधव.