खामगावात जुगारावर छापा, 7 आरोपी पकडले

0

खामगाव (प्रतिनिधी)- स्थानिक घाटपुरी बायपासजवळील किसननगर भागात सुरू असलेल्या जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी काल 15 एप्रिल रोजी रात्री छापा मारून 7 जणांना रंगेहाथ पकडले. त्यांचे जवळून 1 लाख 45 हजार 620 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यासंदर्भात शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार किसननगर भागात पैशाच्या हारजीतवर एक्का बादशहा नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मिलिंद विजय वास्कर, अश्विन विजय वास्कर रा. फरशी, दिपक हर्षद कमाणी रा. किसननगर, भगवान अर्जुन मिरगे, गणेश देविदास खोडके, चेतन गजानन चोपडे सर्व रा. सुटाळपुरा  व गणेश सुधाकर काटे रा. दादगाव या 7 जणांना रंगेहाथ पकडले. त्यांचेजवळून रोख व इतर साहित्य असा एकुण 1 लाख 45 हजार 620 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पीएसआय डिगांबर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द शिवाजीनगर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.