खामगांव (प्रतिनिधी) :- न. प. मुख्याधिकाऱ्यांचे पुढील आदेशापर्यंत भाजीपाला हर्रासी बंद ठेवण्याचे आदेश असतांना स्थानिक गोपाळ नगर भागातील भाजापीला व्यापाNयाने आज दि. २२ एप्रिल रोजी आई साहेब मंगल कार्यालयासमोर भाजापीला हर्रासी भरविली. ही बाब नगर परिषदेच्या कर्मचाNयांना माहिती पडताच त्यांनी तेथे भेट दिली परंतू संबंधितावर कारवाई न करता त्या व्यापाराला सोडून दिले. कृषी विभागाने ग्रामीण भागातील भाजी पिकविणाऱ्यां शेतकऱ्यांना शहरात जाऊन भाजीपाला विकण्यासाठी पासेस दिल्या आहेत. परंतू या शेतकNयांना शहरातील भाजीपाला व्यापारी चिल्लर भाजी विक्री करण्यास मज्जाव करीत असून कमिशनच्या लालसेपोटी हर्रासी भरवित असून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात खामगांव नगर परिषद हद्दीतील आठवडी बाजारात दररोज होणारी भाजीपाला हर्रासी नगर परिषदेने शहरातील ३ वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्याचे सांगूनही संबंधित व्यापाऱ्यांनी आठवडी बाजारातच हर्रासी भरविल्याामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी स्वत: आठवडी बाजारात हजर होऊन संबंधितांविरुध्द काहीच कारवाई न करता १२ एप्रिल २०२० रोजी नोटीस देऊन पुढील आदेशापर्यंत भाजीपाला हर्रासी बंद ठेवण्याबाबत सुचित केले होते. परंतू तरीही संबंधित अडत्यांनी भाजीपाला हर्रासी बंद ठेवली नाही. अशा घटनांमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असून नगर परिषदेचे अधिकारी – कर्मचारी हर्रासी भरविणाNया व्यापाNयांवर कारवाई न करता लहान-लहान भाजी विक्री करणाNयांना नाहक त्रास देऊन त्यांना उठाबशा काढायला लावून हाकलून देत आहेत. न. प. प्रशासनाच्या भेदभावपूर्ण कारवाई बद्दल जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. याला जबाबदार संबंधित व्यापाNयांवर न. प. केव्हा कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.