खामगांव कृ.उ.बा.समितीमध्ये ४८ लाखाचा भ्रष्टाचार ; संबंधीतांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करा

0

खामगांव (प्रतिनिधी) : खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली चालणा-या खामगांव कृ.उ.बा.स.मध्ये मागील सात महिन्याच्या काळात बाजार समितीचे सभापती संतोष टाले, सचिव मुकूटराव भिसे यांनी अनेक कामात गैरप्रकार व अनियमितता करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. साक्षी सिक्युरिटीसोबत बाजार समितीने केलेला करार संपुष्टात आल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे या कामी ई निवीदा काढणे आवश्यक असतांना त्याबाबत कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता साक्षी सिक्युरिटी यांना 48 लक्ष रुपयांचे बिल प्रदान करण्यात आले आहे. सभापती संतोष टाले व सचिव मुकूटराव भिसे यांनी सुरक्षा रक्षकाच्या नावावर बेकायदेशीररित्या सर्व नियम धाब्यावर बसवुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप करीत शेतक-यांच्या संस्थेची लुट करणा-या सभापती, सचिव व सर्व संबंधीतांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव कृ.उ.बा.स.मध्ये सभापती संतोष टाले व सचीव यांनी केलेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, बाजार समितीचे तत्कालीन संचालक श्रीकृष्ण टिकार यांच्यासह पाच संचालकांनी मा.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मा.जिल्हा उपनिबंधक यांनी कृ.उ.बा.स.मध्ये झालेल्या गैर प्रकाराबाबत कृषी उत्पन्न पणन अधिनियम (विकास व विनीमयन) 1963 चे कलम 40-ब नुसार चैकशी करण्याचे आदेश देउन श्री.कोल्हे,सहायक निबंधक,सहकारी संस्था,शेगांव यांची चैकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करुन प्रकरण 45 दिवसात चैकशी अहवाल सादर करण्याचे आदेश 20/07/2020 रोजी दिले होते.त्या अनुषंगाने मंगळवार दि.15 सप्टेंबर 2020 रोजी चैकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी तक्रारीची संबंधीत सर्वांना आपला लेखी जवाब सादर करण्याचे आदेश दिले होते. खामगांव कृ.उ.बा.स.च्या कार्यालयात चैकशी अधिकारी श्री कोल्हे यांनी या प्रकरणी संबधीतांचे म्हणणे जाणुन घेतले. तक्रारदार माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृश्ण टिकार,माजी संचालक संजय झुनझुनवाला,माजी संचालक विवेक मोहता,माजी संचालक राजेष हेलोडे व तुशार चंदेल यांनी झालेल्या भ्रश्टाचाराबाबत आपला लेखी जवाब व त्या संबंधींचे पुराव्यासह सर्व कागदपत्रे चैकषी अधिकारी यांच्याकडे सुपुर्द केली.

यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी चैकशी अधिकारी यांच्या निदर्शनास आणुन देतांना सांगितले की, बाजार समितीने मागील 7 महिन्याच्या काळात साक्षी सिक्युरिटीला वेळोवेळी 48 लक्ष 24 हजार 552 रुपयांचे बिल जीएसटीसह प्रदान केले आहे.

सुरक्षा रक्षकांसाठी बिले काढतांना साक्षी सिक्युरिटीने सादर केलेल्या हजेरी पुस्तीकेच्या प्रतींची सुक्ष्म अवलोकन केल्यास त्यावर अनेकांच्या नावाने दोन किंवा तीन व्यक्तीच्या हस्ताक्षराने बनावट स्वाक्ष-या केल्याचे दिसुन येईल. तसेच हजेरी पुस्तीकेत काही ठिकाणी फक्त अडनाव देवुन स्वाक्षरी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात डयुटीवर कमी सुरक्षा रक्षक असतांना रेकाॅर्डवर जास्त सुरक्षा रक्षक असल्याचे दाखवुन खोटे रेकाॅर्ड तयार करण्यात आले आहे. लाॅकडाउन काळात बाजार समिती बंद असतांना सुध्दा डयुटीवर सुरक्षा रक्षक हजर असल्याचे रेकाॅर्ड तयार करण्यात आले.तसेच नाफेड खरेदी केंद्रावर सुरक्षा रक्षक डयुटीवर हजर असल्याचे दाखवुन त्याची खोटी बिले काढण्यात आली आहे.

साक्षी सिक्युरिटीने सादर केलेल्या हजेरी पुस्तीकेेचे नोटशिट व संबंधीत कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केल्यास सभापती व सचिव यांनी साक्षी सिक्युरिटीच्या नावाखाली काढलेल्या बिलांमध्ये बेकायदेशीररित्या मोठया प्रमाणात अपहार केल्याचे दिसुन येईल. म्हणून साक्षी सिक्युरिटीने सादर केलेल्या हजेरी पुस्तीकेवरील कर्मचा-यांच्या नावाची व स्वाक्षरीची पडताळणी करुन त्यांचे आधार कार्ड तपासण्यात यावे व त्यांच्याकडून शपथपत्र लिहुन घेण्यात यावे असे सानंदा यांनी चैकशी अधिका-यांना सांगितले.
म्हणून या संबंधींचे सर्व रेकाॅर्ड तपासण्यात यावेतसेच नियमबाहय व बेकायदेशीररित्या सुरक्षा रक्षकांवर लाखो रुपये खर्च करुन बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याबदद्ल सभापती , सचिव व ठरावाच्या बाजुने असलेले संचालक सह सर्व व्यक्तींवर चैकशीअंती भ्रष्टाचार सिध्द झाल्यास त्यांचेवर भारतीय दंड विधानाचे कलम 406, 408,420, 465, 468,477(अ)120 (ब) व 34 इतर कलमान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी चैकशी अधिकाÚयांकडे केली आहे. या चैकशीमुळे खामगांव कृ.उ.बा.स.च्या क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण झाली असुन अनागोंदी व नियमबाहय काम करणाÚया सभापती व सचिवांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.