खान्देशात भाजपला मोठ खिंडार, विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर?

0

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांनी राष्ट्रवादीमध्ये  प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. आता भाजपला आणखी एक बसण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे   विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कार्यकर्तेपासून ते भाजपच्या आमदारांपर्यंत सर्वांनी राष्ट्रवादीचा वाट धरली आहे. खडसे यांच्या निवास्थानी आधीच भाजपचे शेकडो कार्यकर्त हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. आता तर थेट विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रवेश सोहळ्यात  भाजपमधील दोन मोठ्या नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि नवाब मलिक यांनी  भाजपमध्ये गेलेले काही आमदारांची पुन्हा घरवापसी होणार आहे, असे संकेत दिले होते. त्यानुसार आता काही आमदार आणि नेते हे परत राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.

 

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा 11 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त ते वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात.  यंदाही जाहिरात देण्यात आली आहे पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही.मात्र, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा फोटो जाहिरातींमध्ये असल्याने भाजप आमदार संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.

 

संजय सावकारे हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते. 2009  मध्ये एकनाथ खडसे यांच्या वरदहस्ताने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढवून जिंकून आले होते. आता एकनाथ खडसे यांनी हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकनाथ खडसे असतांना त्यांचे निकटवर्तीय असलेले संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये जाणार का ? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here