रावेर । तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवामध्ये चार भावंडांची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेने जळगाव जिल्हा आणि रावेर तालुका प्रचंड हादरला आहे. यात दोन बहिणींचा समावेश आहे.
रावेर शहरालगत अंतरावरील बोरगाव शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात 15 ऑक्टोबर रोजी गेले होते. दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली. सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता. चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला. हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली.