Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खळबळजनक : भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता
    जळगाव

    खळबळजनक : भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता

    By March 17, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक उद्या १८ मार्चला पार पडणार आहे.  त्या आधीच  भाजपच्या नगरसेविका सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण हे बेपत्ता झाल्याची घटना आज समोर आली आहे. याबाबत पती बाळासाहेब चव्हाण यांनी आज रामानंदनगर पोलीस स्थानकात  हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

     

    महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदावरून अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. उद्या ऑनलाईन सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार असल्यामुळे अज्ञात ठिकाणी राहून सुध्दा मतदान करता येणार असल्याने दोन्ही बाजूंनी ही काळजी घेतली आहे.आधीच भाजपचे ३० नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहे. यात आता भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

     

    या फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण या काही नगरसेविकांसोबत दिनांक १४ मार्च रोजी रात्री नाशिक येथे रवाना झाल्या. यानंतर १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता एका नगरसेविकेच्या मोबाईलवरून त्यांनी आपल्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क साधला. यानंतर त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला नसल्यामुळे रामानंदनगर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत फिर्यादी बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण रामानंदनगर पोलीस स्थानकात मिसींगची फिर्याद दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच आता ते नाशिकच्या दिशेने निघाले असून पारोळ्यापर्यंत पोहचले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif