एरंडोल ;- तालुक्यातील खर्ची येथील १७ वर्षीय युवक अमळनेरमधून बेपत्ता झाला आहे. सदर बेपत्ता युवक हा मतिमंद असल्याचे समजते. महेश सुरेश माळी(विक्की) वय १७ हा २ मे २०१८ रोजी सकाळी प्रमोद महाजन, कासार गल्ली यांच्या राहत्या घरातून कुणासही न सांगता निघून गेला. याबाबत अमळनेर पो.स्टेला त्याचे वडिल सुरेश लोटन माळी रा. खर्ची ता.एरंडोल यांच्या तक्रारीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास हे.कॉ.प्रभाकर पाटील हे करीत आहेत. सदर युवकाची उंची ४ ते ४.५ फुट असून तो मतिमंद आहे. तसेच सावळा रंग असून कुबड निघालेले आहे. अंगावर गुलाबी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. कुणालाही सदर युवक आढळल्यास मो.नं.०९६७३०९०६२८, ९५५२१०३२६१ या क्रमांकावर अथवा अमळनेर पोलिसात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.