खरिपाच्या पेरणीवर पावसाने फिरवली पाठ ; शेतकऱ्यांची चिंता वाढली

0

जामनेर (पंढरी पाटील): जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोरोना सारख्या महामारीच्या विषयाला बाजूला सारून बळी राजा सुकावला होता. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरोशावर जूनच्या १०-१२ तारखेलाच हजारो रुपयांचे बियाणे काळ्या आईच्या उदरात टाकून दिले आहे.

सुरुवातीच्या आठवड्यात पाऊस चांगला झाल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची उगवन शक्ती चांगली झाल्याने पिके जमिनीच्या वर डोलायला लागली आहेत. परंतू निसर्गाच्या लहरी पणाचा फटका सुरुवातीलाच शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने बळी राजाला पाऊसाची आस लागून आहे.एकतर कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बहुतांश शेतकऱ्यांचा माल जसे मका,हरभरा,कापूस घरातच पडून आहे.तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जाते.ते सुध्दा शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून वा कृषी केंद्र चालकांकडून उधारीवर बी.बियाणे घेऊन काळ्या आईच्या कुशीत टाकून निसर्गाच्या भरोशावर सट्टा खेळला आहे. आधीच कर्जाच्या विळख्यात सापडलेला बळी राजा पाऊस लवकर न आल्यास हजारो रुपयांचे बियाणे नष्ट होऊन अजूनच कर्जबाजारी होणार आहे. आधीच कोरोना

मुळे घरातच शेतकऱ्यांचा माल पडून असल्याने व काही शेकऱ्याना आपला माल बाहेरील व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीत विकावा लागल्याने त्यांचे कंबरडे मोडले गेले आहे.संपूर्ण देशात कोरोना ह्या महाभयंकर साथीच्या आजाराने थैमान घातलेले असताना.व संपूर्ण देशात कोरोनाचे भीतीचे वातावरण पसरलेले असताना कोरोना योद्धा नंतर जर कोणी कोरोनाला तोंड देत असेल तो बळी राजा आहे. लॉक डाऊन मुळे सर्व उद्योग धंदे बंद पडलेले असताना व संपूर्ण जनता कोरोनाच्या भीतीने आपापल्या घरी बंदीस्त असताना जगाचा पोशिंदा हाच बळी राजा आपल्या सर्वांची भूक भागवण्यााठी आपल्या शेतामध्ये राबराब राबतो आहे. कधीही त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचा भाव तो स्वतः ठरवत नाही.कधी काळी शेतकऱ्यांच्या एखाद्या फळ ,भाजीपाल्याचे दर वाढले तर आपणच ओरडत असतो. आणि निसर्गाच्या लहरी पणाचा फटका बसतो तो बसतोच. तरीही आपण कधीही त्याचा सहानभूती पूर्वक  विचार करून ,त्यांना सहकार्य करीत नाही. त्यांच्या द्वारे उत्पादीत केलेल्या मालाला भाव कमी मिळाला म्हणून तो कधीही संप पुकारत नाही.जे मिळाले त्यात समाधान मानणारा बळी राजा सर्व बाजूने नाडला जात आहे. अशा ह्या बळी राजाला आर्थिक सहकार्याची नितांत आवश्यकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.