खरद येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

0

चोपडा प्रतिनिधी |  तालुक्यातील खरद येथील रहिवासी शेतकरी प्रकाश प्रताप पाटील (५२)यांनी आज राहत्या घरी सकाळी साडेनऊ वाजता कर्जाला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शेतकरी प्रकाश पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना कळण्यानंतर घटनेची माहिती खरद येथील पोलीस पाटील विजय भिका पाटील यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

मयत शेतकरी प्रकाश पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली तर इतर बॅकाचे देखील कर्ज असण्याची शक्यता आहे.

दुपारी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्याचा पच्यात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मजरेहोळ येथील गणेश ऍग्रो चे संचालक अनिल भिकाजी पाटील यांचे व्हाई होते.

Leave A Reply

Your email address will not be published.