खते व बियाण्याच्या वाढलेल्या किमती कमी करा

0

अमरावति (प्रतिनिधी) :  सध्या सर्वत्र खरिप हंगामाची तयारी सुरू असतांना केंद्र सरकारने खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार असून गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे लाॅकडाऊनचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना वेठिस धरणारी ही भाववाढ त्वरित मागे घेण्यात यावी . व पेट्रोल, डिझेल,गैस ची भाववाढ कमी करण्याच्या मागणीसाठी बुधवार 20 मे रोजि तिवसा तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.

शेतकरी,शेतमजूर गोरगरीब जनतेचे महागाई मुळे हाल होत असताना पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात भाववाढ करने म्हणजे शेतकरयांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे केंद्र सरकार व भारतीय जनता पार्टी या देशातल्या जनतेला लुटण्याचे काम करत असुन एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही.

शेतीवरील खर्चात वाढ,मात्र उत्पादन कमी, शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो आहे अशा परीस्थितीत लवकरात लवकर खतं, बियाणे, पेट्रोल,गैसच्या किंमती केंद्र सरकारने कमी कराव्या अशा मागणीचे निवेदन यावेळी तिवसा तहसिलदार यांना दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.सुभाष तंवर,तिवसा शहर अध्यक्ष अजय सुरटकर,रायुका अध्यक्ष हेमंत बोबडे, मागासवर्गीय सेल अध्यक्ष विलास वावरे, ओबीसी सेल अध्यक्ष जगदीश कडगे,दिनेश गंधे,बच्चु वानखडे,संजय पोल्हाड, आकाश लांजेवार,मंगेश पोल्हाड उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.