खतांवरील अनुदान कसं मिळणार?, जाणून घ्या प्रोसेस

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयानुसार डीएपीच्या 50 किलोच्या एका पोत्यावरील अनुदान 700 रुपयांनी वाढवून 1200 करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं डीएपीवरील अनुदान वाढवल्यानं शेतकऱ्यांना डीएपी 1200 रुपयांना उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

शेतकऱ्यांना डीएपी खरेदी करण्यासाठी 1200 रुपये द्यावे लागतील. डीएपी खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड किंवा शेतकरी कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचे ठसे द्यावे लागतील. त्यानंतर केंद्र सरकार संबंधित कंपनीच्या खात्यात अनुदान जमा करेल. केंद्र सरकार एका पोत्यामागं 1211 रुपये कंपन्यांना अनुदान देणार आहे. डीएपीवरील अनुदानासाठी केंद्र सरकार 14 हजार 775 रुपये खर्च करणार आहे.

डीएपी आणि पीएंडके या खतांवरील अनुदानात वाढ केल्याची अधिसूचना 20 मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वाढवण्यात आलेलं अनुदान 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. यानुसार, 2411 रुपयांचं डीएपीचं एक पोत 1200 रुपयांना शेतकऱ्यांना मिळेल. केंद्र सरकारनं डीएपीवरील सबसिडी 140 टक्के वाढवल्याचं म्हटलं आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे आखाती देशांनी डीएपी खताच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्चा मालाची किंमत वाढवल्यानं डीएपी खताच्या किंमती वाढल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. खतांच्या वाढत्या किंमतीवरुन शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारनं डीएपी आणि पीएंडके खतावरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.