खड्ड्यांमुळे उलटला कंटेनर: सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

0

बोदवड – तालुक्यातील बहुतेक रस्त्यांच्या मधोमध खड्डेचं खड्डे पडले असून ‘खड्ड्यांत रस्ते कि रस्त्यांत खड्डे’ असे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवताना वाहक धारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.तरीही खड्डे जैसे तेचं असल्याने संबंधित विभागाचे दूर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

काल रात्री दहा वाजेच्या सुमारास औरंगाबादहून नोएडा (यु.पी.)कडे जाणा-या एक कंटेनर क्र.(एच.आर.३८ क्यु ४८८५ ) शेलवड फाट्याजवळ रस्त्यातील भल्यामोठ्या खड्ड्यांत जावून आदळून व उलटला मात्र सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची प्राणहानी अथवा कंटेनर मधील साहित्याचं नुकसान झाले नाही.कंटेनर मध्ये व्हिडिओकॉन कंपनीच्या मशिन असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सुकपालसिंग श्रीगोंदालाल जाठक यांच्या खबरीवरून बोदवड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.