Saturday, October 1, 2022

खडसेंवर ईडीची कोणतीही कारवाई झालेली नाही- रोहिणी खडसे

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

ईडीचे  काही वरिष्ठ अधिकारी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी धडकले असून तिथं काही तास चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी अधिक चौकशीसाठी मुंबईला घेवून गेल्याची अफवा सोशल मीडियावर चांगलीच फिरत आहेत.  माजी मंत्री एकनाथराव खडसे हे दोन दिवस बाहेरगावी गेले असून आज ईडीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसून या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने मुक्ताईनगर येथे खडसे यांच्या निवासस्थानी छापा टाकल्याची माहिती समोर आली असून  खडसेंचे फार्महाऊस बंद आढळले. तर कोथळीतील घरी देखील कुणी आढळून आले नाही. या प्रकरणी आम्ही जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्याशी संपर्क साधला.

याप्रसंगी रोहिणीताई म्हणाल्या की, नाथाभाऊ अथवा आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना आज ईडीने नोटीस बजावली नसून अन्य कोणतीही कारवाई केलेली नाही. सोशल मीडियात सर्व अफवा पसरल्या असून यावर कुणीही विश्‍वास ठेवू नये. नाथाभाऊ हे दोन दिवसांसाठी बाहेर गेले असून ते नंतर चाहत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती सुध्दा रोहिणीताईंनी दिली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या