खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना विचारा ; खा.सुप्रिया सुळे

0

पुणे । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षातील नेत्यांची अळीमिळी गुपचिळी सुरुच आहे. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी खडसेकाकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसेंकडे टोलवला होता, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलणं टाळलं. नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याची चर्चा आहे. मात्र अवघ्या काही तासांवर घटस्थापना आली असतानाही त्याबद्दल स्पष्टता नाही.

 पवार कुटुंबियांवर टीकेशिवाय हेडलाइन होत नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयकासाठी रॅली काढली, त्याच भागात साखर कारखाना बंद आहे. पवार कुटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत, कोणीही यावं आणि मन मोकळं करावं, आम्ही दिलदार आहोत, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.