खंडित वीजपुरवठाविरोधात शेतकऱ्यांनी ठोकले विजवीतरण कार्यालयाला टाळे

0

कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या लोण पिराचे यासह ६ खेड्यामध्ये गेल्या १५ दिवसापासून शेतीशिवरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या गावातील शेतकऱ्यांनी २६ रोजी विजवीतरण कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकत रास्ता रोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी ०१ मार्च पर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी रस्ता रोको मागे घेत टाळे उघडले.

तालुक्यातील लोण पिराचे उपकेंद्रास सहा गावे जोडली आहेत. गेल्या १५ दिवसापासून खंडित विजपुरवठ्या मूळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी २६ रोजी सकाळी १० वाजता लोण पिराचे येथील विजकेंद्राच्या गेटला टाळे ठोकून रस्त्यावर रास्त रोको आंदोलन केले.

याबाबतची माहीती लोण येथील सरपंच विजय पाटील यांनी खासदार उन्मेश पाटील आमदार किशोर  यांना दिली त्यांनी विजवीतरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या वीज वितरणाचे अभियंता ए. एल. वडर, ए. ए. धामोळे, जी. एम. मोरे लोण पिराचे उपकेंद्राचे प्रभारी ज्युनिअर इंजिनिअर दहीवले यांनी शेतकऱ्यांची भेट घेत १ मार्च पर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेतले.

 

आंदोलनात विजय पाटील, संजय पाटील, प्रताप परदेशी, गोपाळ माळी, प्रभाकर पाटील बोरनार, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र पाटील, गोविंदा पाटील, योगेश माळी, बाबाजी पाटील, भूषण पाटील, संभाजी पाटील, पी. डी. माळी, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दादा माळी, रमेश पाटील, सुरेश खैरनार, आबा माळी, ईश्वर माळी, परशराम पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील आदी शेतकरी सहभागी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.