Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»खंडाळा घाटात भीषण अपघातात १७ मजूर ठार
    ताज्या बातम्या

    खंडाळा घाटात भीषण अपघातात १७ मजूर ठार

    By April 10, 2018No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    १३ जखमी
    पुणे ;– पुणे-सातारा महामार्गावरील खंडाळा घाटात एका टेम्पोला आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात १७ मजूर ठार झाले आहेत, तर १३ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

    सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त टेम्पो कर्नाटकहून ३५ मजूर घेऊन शिरवळ एमआयडीसीकडे चालला होता. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते. मालवाहतूक करणाऱ्या या टेम्पोत ( केए – ३७ / ६०३७ ) ३५ पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर नेहमीच्या अपघातग्रस्त एस कॉर्नरवर हा भरधाव टेम्पो उलटला. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी कठड्यावरून हा टेम्पो बाहेर फेकला गेला. टेम्पोत बांधकामाचे अवजड साहित्य असल्यामुळे यातील कामगारांना याचा फटका बसला. चार महिला अन् एक मुलगा यांच्यासह सुमारे १७ जण जागीच ठार तर बाकीचे २० गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टेम्पो चालकाचाही समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. दरम्यान याच टेम्पोच्या पाठीमागून येणाऱ्या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तात्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे अन् त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif