क्षयरोग रुग्णांची माहिती लपविल्यास होणार तुरुंगवास

0
नवी दिल्ली –
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने क्षयरोगाच्या रुग्णांची माहिती न दिल्यास आता डॉक्टर्स, रुग्णालय प्रशासन, केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांना तुरुंगवास भोगावा लागू असे परिपत्रक काढले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकात म्हटल्यानुसार, वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांनी जर त्यांच्याकडे नोंद झालेल्या क्षयरोग रुग्णांची माहिती नोडल अधिकारी किंवा स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना न दिल्यास तेथील डॉक्टर्स, रुग्णालय प्रशासन, केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांना भारतीय दंड विधान कलम २६९ (प्राणघातक आजार पसरवणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करणे), कलम २७० (द्वेषभावनेने प्राणघातक आजारांकडे दुर्लक्ष करणे) यांतर्गत कमीत कमी सहा महिने ते दोन वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामध्ये कलम २६९ नुसार सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड तर कलम २७० नुसार दोन वर्षांसाठी तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.
वैद्यकीय संस्था कशाला म्हणायच्या याचा उल्लेख क्लिनिकल एस्टॅब्लिश्ट अॅक्ट २०१०मध्ये करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावरील वैद्यकीय संस्था, रुग्णालये, क्लिनिक्स, डिस्पेन्सरीज, डायग्नोस्टिक सेवा या एकाच डॉक्टरकडून चालवल्या जात असतील तर त्यांना हा शिक्षेचा नवा नियम लागू असणार असे यामध्ये म्हटले आहे.
भारतात २०१२मध्ये ‘क्षयरोग’ हा दखलपात्र आजार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण कोणत्याही कायद्याची यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी तरतुद नसल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात स्वतंत्र माहिती देणाऱ्या अर्जाचा नमुना तयार करण्यात आला आहे. हा नमुना अर्ज मेडिकल प्रॅक्टिशनर्स, क्लिनिक्स, रुग्णालये, नर्सिंह होम्स यांना लागू करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.