क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचा परवाना होणार निलंबित

0

जळगाव :- राज्यात सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या धोरणांमध्ये समन्वय राखण्याच्यादृष्टीने राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जळगाव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या क्षेत्रात करण्यात येणार असून या निर्णयांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर, 2020 पासून सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या ठरावानुसार जादाभार वाहतूक करणा-या वाहनाच्या परवानाधारकांकडून मोटार वाहन अधिनियम 1988 च्या नियम 86 अंतर्गत विभागीय कारवाई सुरु होणार असून सकल भार क्षमतेपेक्षा (जी.व्ही. डब्ल्यु) अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या

हलकी मालवाहू वाहने – अतिरिक्त भार 5 हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्हयांसाठी परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 5 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 10 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 15 हजार रुपये असे राहील. तर 5001 किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 7 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 14 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 21 हजार रुपये असे राहील.

मध्यम मालवाहू वाहने – अतिरिक्त भार 5 हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्हयांसाठी परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 10 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 20 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 30 हजार रुपये असे राहील. तर 5001 किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 15 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 30 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 45 हजार रुपये असे राहील.

जड मालवाहू वाहने – अतिरिक्त भार 5 हजार किलोग्रॅमपर्यंत पहिल्या गुन्हयांसाठी परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 20 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 40 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 60 हजार रुपये असे राहील. तर 5001 किलो ग्रॅमपेक्षा जास्त भार असल्यास परवाना 10 दिवसाकरीता निलंबित करणे अथवा निलंबनाऐवजी सहमत शुल्क 25 हजार रुपये राहील. दुसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 20 दिवस निलबंन अथवा सहमत शुल्क 50 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना 30 दिवस निलंबन अथवा सहमत शुल्क 75 हजार रुपये असे राहील.

त्याचबरोबर जळगाव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षांच्या वयोमर्यादेसंबंधी दि 12 जून, 2019 रोजी ठराव क्र.02/2019 नुसार ऑटोरिक्षांच्या 16 वर्ष वर्यामर्यादेबाबत घेतलेला निर्णय रद्द करुन राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांनी पारित केलेल्या ठरावानुसार ऑटोरिक्षांच्या वयोमर्यादेबाबत अंमलबजावणी सुरु करण्याच्या निर्णयही एकमताने घेतला आहे.

मुंबई व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये ऑटोरिक्षाकरीता सुधारित वयोमयादा (वर्ष) गणनेचा दिनांक दि. 1 ऑगस्ट, 2021 पर्यंत 20 वर्षे, दि. 1 ऑगस्ट, 2022 पर्यंत 18 वर्षे, दि. 1 ऑगस्ट, 2023 पर्यंत 16 वर्षे, दि. 1 ऑगस्ट, 2024 पर्यंत 15 वर्षे इतकी राहील असेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.