क्रूझर व मोटार सायकलची जोरदार धडक, एक ठार पाच जण जखमी

0

चोपडा अडावद रस्त्यावर घडला अपघात, एकाच परिवारातील आई-बहीण व भाऊ जखमी!!

चोपडा
वढोदे ता यावल येथील रहिवासी असलेले बाविस्कर परिवार हा आज कोळंबा ता चोपडा या गावी रवींद्र बाविस्कर याच्या उत्तरकार्य व दशक्रिया विधीच्या कार्यक्रम आटोपुन घरी जात असताना चोपडा अडावद रस्त्यावर मंगरूळ फाट्यावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास क्रूझर व मोटार सायकल च्या समोरा समोर अपघात होऊन क्रूझर गाडी झाडावर आदळल्याने या गाडीतील एक जण जागीच ठार तर गाडीतील चार जण व समोरील येणारा मोटार सायकल स्वार देखील गँभिर जखमी असून याना जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या अपघातात क्रूझर मध्ये एकाच घरातील आई,बहीण,भाऊ तिघे जण जखमी आहेत.
या अपघातातील मोटार सायकल चालक कल्पेश निंबा चौधरी (रा खंडेराव नगर जळगाव) हा गँभिर जखमी असून त्याचा उजव्या पायाला मोठी दुखापत झाली असून त्याला देखील जळगाव सामान्य रुग्णालयात हलविले आहे.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोळंबा येथुन उत्तरकार्य संपून वढोदे ता यावल येथे घरी जात असताना कल्पेश निंबा चौधरी (रा खंडेराव नगर जळगाव) हा चोपड्या कडे येत असताना क्रूझर क्र एम एच 19-अपी -4956 व मोटार सायकल याच्यात समोरासमोर धडक होऊन क्रूझर गाडी ही रस्त्याच्या खाली उतरून झाडाला ठोकली गेल्याने या क्रूझर मधील दुर्गासास लीलाधर सोनवणे(35) बहीण-माधुरी रवींद्र बाविस्कर(28)आई सुमनबाई लीलाधर सोनवणे(50)व प्रभाकर सुकराम बाविस्कर(42)हे चार जण गँभिर जखमी झाले आहेत.तर अनिल विठ्ठल सोनवणे(45)हे अपघातात जागीच ठार झाले होते.
आजच्या बारा दिवसांपूर्वी रवींद्र बाविस्कर कोळबा ता चोपडा याचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.आज त्याचे दशक्रिया व उत्तरकार्य संपून घरी वढोदे ता यावल ला घरी परत असताना हा अपघात झाला असून या अपघातात कोळंबा रवींद्र बाविस्कर याच्या पत्नी माधुरी बाविस्कर याना देखील डोळ्याला गँभिर दुखापत झाली असून त्यांना साडे आठ महिन्याचे दिवस असून त्या केव्हाही बाळतंण होऊ शकतात असेही उपचारावेळी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सागितले होते.
या अपघातातील जखमी ना घेऊन जाण्यासाठी हिसाळे ता शिरपूर येथील 108 रुग्णवाहिका द्वारे डॉ राहुल पाटील ,पायलट नरेंद्र नाईक,यांनी त्यांना जळगावला हलविले होते.यावेळी चोपडा तालुक्यातील कोणतीच 108 उपलब्ध नव्हती.या जखमीवर वैदयकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील,डॉ पंकज पाटील,डॉ गुरुप्रसाद वाघ,डॉ तृप्ती पाटील व सामाजिक कार्यकर्ते सागर बडगुजर यांनी उपचार केले होते.
**अपघाताचे वृत्त कळताच यावल येथील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, प स सदस्य महेंद्र कोळी,भाजप युवामोर्चा तालुका सरचिटणीस योगेश साळुंके,भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष व्यकटेश बारी,तसेच घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे सदस्य जगन्नाथ बाविस्कर,जितेंद्र पाटील,नितीन निकम, यांनी चोपडा उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.