जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराचे वितरण
जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा संकुलाचा अध्यक्ष या नात्याने क्रीडाशिक्षक ,खेळाडू, व क्रीडा संघटना यांना योग्य न्याय दिला जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराचे वितरणप्रसंगी केले .
जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच झाला. राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारथी डॉ.नारायण खडके, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार, नगरसेवक नितीन बरडे यांचे हस्ते सचिन लोटन सुर्यवंशी ( सा. दा. कुडे माध्य. विद्यालय धरणगांव ) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर कोरोना काळात क्रीडाशिक्षक यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे. असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील साहेब यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर यांनी पुरस्कारा विषयी माहिती सचिव राजेश जाधव यांनी दिली तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रशांत जगतात यांनी केले.



