कोविड- १९ संदर्भात वरणगाव शहरासाठी त्वरीत पुरेशी उपायोजना करावी

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  कोविड- १९ यासंदर्भात वरणगाव शहरासाठी  त्वरीत पुरेशी उपायोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे  महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली असून याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले . तसेच याकार्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते  मदतीसाठी सदैव तयार असल्याची ग्वाही दिली आहे.

कोविड- १९ ही जागतिक महामारी घोषित झालेली आहे. भारतासह महाराष्ट्रात देखील कोविड- १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, सुदैवाने आपल्या जळगाव जिल्ह्यात सध्या तरी रुग्ण संख्या कमी आहे परंतु एकंदरीत पाहता कोविड- १९  चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत त्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपण सॅनेटायझर फवारणी व्यतिरीक्त इतर कोणत्याही खबरदारीच्या उपाययोजना केलेली नाही. दुर्दैवाने कोविड- १९ आजाराची साथ आपल्या भागात पसरल्यास पूर्वनियोजन नसल्याने आरोग्यदृष्ट्या हा विषय अडचणीचा होऊ शकतो. परिसरातील कोविड- १९  शी लढण्याची बऱ्याच प्रमाणात तयारी सुरु आहे. काही ठिकाणी शाळा, वसतिगृह, सरकारी रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अशा ठिकाणी स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या वरणगाव नगरपालिका क्षेत्रात मात्र अशी कुठलीच पूर्वतयारी झालेली असल्याचे निदर्शनास आलेले नाही तरी  कोविड- १९  या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता आपण आपले स्तरावरून तात्काळ हालचाली गतिमान करून पूर्वतयारी करावी, जेणेकरून दुर्दैवाने आपल्या शहरात कोविड- १९ चे पेशंट आढळल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार करून कोविड १९ शी लढा देता येईल , आपण तात्काळ आपल्या वरिष्ठांशी संपर्क करून वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालय तसेच इतर ज्या ठिकाणी शक्य होईल, त्या त्या ठिकाणी रुग्णांसाठीच्या बेडची व्यवस्था करून ठेवावी व वरणगावकर यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सज्ज व्हावे. ज्यावेळेस आपणास कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा असेल तेव्हा आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आपणास मदतीसाठी तयार आहोत. कोणत्याही प्रकारचे मदत लागल्यास आम्ही सज्ज आहोत  आपण या निवेदनाचा  तात्काळ विचार करून  कार्यवाही करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.