कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

0

मुंबई : केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

 

आज पहाटे 5.30 वाजता मुंबईत या लसीचा पहिला साठा पोहचला असून लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला साठा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने पुण्याहून मुंबईत आणला.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे. इथून तो मुंबईतील वेगवेगळ्या केंद्रांवर लसीकरणासाठी पाठवण्यात येणार आहे.

 

दरम्यान, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला मिळाले आहेत.16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.