भङगाव :- तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलीत गोपीचंद पुना पाटील विदयालय व कनिष्ठ महाविदयातील व्यायाम शाळेचे साहीत्य अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घङली.
याबाबत माहीती अशी कि, तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील विदयालय व कनिष्ठ महाविदयातील व्यायाम शाळेच्या खिङकीचे गज वाकवुन अज्ञात चोरटयांनी व्यायामाचे साहित्य चोरुन नेल्याची घटना घङली. यात एकुण १३ वस्तु व्यायामाचे चोरीस गेल्या आहेत. याबाबत कोळगाव विदयालयाकङुन मुख्याध्यापकांनी भङगाव पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.