चोपडा (प्रतिनिधी) | तालुक्यातील कोळंबा येथील एका २५ वर्षीय तरुणाने सायंकाळी धनवाडी शिवारातील शेतात आंब्याच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राहुल अविनाश कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे.
राहुल कोळी याने रविवारी सायंकाळी धनवाडी शिवारातील सुभाष तरोडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मयत स्थितीत नातेवाईकांनी दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ पवन पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो हे कॉ सुनील पाटील तपास करीत आहेत.