कजगाव- गेल्या मार्चपासुन कोरोनाच्या संकटाशी शासन व प्रशासन मुकाबला करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.तसेच अनेक सेवाभावी संस्थाही ह्या कार्यात सहभागी होत आहे.अशा परिस्थितीत आमरोळी ता.चंदगड जिल्हा कोल्हापुर येथील एक ध्येयवेडाने झपाटलेले तरुण नितीन नागनुरकर हे गेल्या 1 आँक्टोबर 2020 पासुन कोरोनाची जनजागृती सायकल वरुन करीत आहे.समाजात कोरोनाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने ह्या ध्येयवेड्या तरुणाने आजपर्यंत महाराष्ट्रातील 34 जिल्हे व 240 तालुक्यात जाऊन कोरोनाची जनजागृती केलेली आहे.

आज त्यांचे भडगाव येथे आगमन झाले.त्यांचे भडगाव तालुका आरोग्य कार्यालयामार्फत शाल,श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर प्रसंगी गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी नितीन नागनुरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केले.नितीन यांनी सांगितले की त्यांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय असुन कोरोनामुळे लाँकडाऊन झाल्यानंतर नागरिक नियमांचे पालन करीत नाही.हे बघुन माझ्या मनात आपण कोरोनाची जनजागृती करावी असे वाटले.म्हणुन मी सायकल वरुन कोरोनाची जनजागृती करीत आहे.याबाबत मला प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे सहकार्य मिळत आहे.आजवर मला अनेक बरे-वाईट अनुभव आलेले असुन मी गडचिरोली जिल्ह्यात असतांना माझ्या जवळील पैसे हिसकावुन घेतले.
पोलिस आल्याने पुढील अनर्थ टळला.भविष्यांत 154 देशांमध्ये सायकल वरुन प्रवास करण्याचा प्रयत्न आहे.अनेक ठिकाणी अजुनही नागरिक मास्क,सोशल डिस्टन्स आदी नियामांचे पालन करतांना दिसत नाही.तरी नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे.प्रत्येकाने माझी कुटुंब,माझी जबाबदारी ह्या मोहिमेला अनुसरुन आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी.असे आवाहन केले.आजच्या सत्कार प्रसंगी कजगाव येथील वैद्यकिय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील,पिंपरखेड येथील डाँ.प्रतिक भोसले,गुढे येथील डाँ.नितीन सोनवणे,आरोग्य सहाय्यक जयराम महाजन,अजय अलई,दिपक पाटील,नासीर पटेल आदी उपस्थित होते.

